योगा

 योगा।

योगा हा समूह आहे .जो जीवनातील शारीरिक, मानसिक,बौध्दिक घटकांचा विकास करण्यासाठी महत्वपूर्ण घटक आहे, जो भारतात प्राचीन काळापासून जवळपास5000 हजार वर्षांपासून चालत आलेला आहे.ज्याचा मूळ उगम भारतातच झालेला आहे.

मूळ योगाचा उल्लेख वृग्वेदात आढळतो.

 मी खात्रीपूर्वक सांगू शकतो जर आपण दिवसाची सुरुवात कमीतकमी 20 मिनिटे योगा, सूर्यनमस्कार व प्राणायाम केल्यास शरीरातील मेंटाबॉलिझम संतुलीत राहील आणि शरीरातील रक्ताभिसरण सुरळीतपणे राहील.

 ताण तणाव, चिंता, काळजी, भीती,मानसिक दुर्बलता आणि नकारात्मक विचारातून सुटका होइन ।

शरीराला सुदृढ आणि मनाला उत्साही व मेंदूला तल्लख ठेवायचे असेल तर दररोज सकाळी उठल्यावर बाथरूम करून फ्रेश होणे आणि  त्या नंतरच सूर्यनमस्कार, योगासन, प्राणायाम व ध्यानधारणा केल्यास मानवी जीवनात जे बदल होतात ते फक्त अनुभव घेऊन च कळेल.

     आपण जेव्हा फिटनेस चा विचार करतो,तेव्हा मसल्स बनवणे हा सध्या तरुणाईचा जिव्हाळ्याचा विषय असतो म्हणून तरुणाई जिमला जाण्यासाठी प्राधान्य देतांना सद्यस्थिती दिसते .परंतु फिटनेस चा विचार करतांना शारीरिक आरोग्य महत्वाचे आहे,त्याच बरोबर मानसिक बौद्धिक म्हणजे आपल्या मेंदूचे आरोग्य आणि मन यांच्याकडे मात्र सर्वांचेच दुर्लक्ष होतांना आढळत आहे.

     आरोग्या बरोबर मन,बुद्धी सुदृढ असणे सुध्दा तितकेच महत्वाचे आहे यासाठी सूर्यनमस्कार, योगासन, प्राणायाम व ध्यान धारणा काळाची गरज आहे आणि याच गोष्टीची दखल घेत भारत सरकारने ' योगा दिवस' साजरा करायला सुरुवात केली त्याच बरोबर 'इंटरनॅशनल योगा डे' साजरा केला जातोय,याचा उद्देश हाच आहे की सर्वांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी.

     योगा शरीरालाच नाही तर मनालाही सुदृढ करण्यास मदत करतो, शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहावे म्हणून योगाला जीवनात महत्व दिलेच पाहिजे.दिवसाची सुरुवात मन प्रसन्न ठेऊन झालीतर आपण निश्चित केलेल्या ध्येय प्राप्तीची नवी वाटचाल नव्या जोमाने होईल आणि ध्येय प्राप्त झाल्यावाचून राहणार नाही,नेहमी प्रसन्न रहा आनंदी रहा आपल्या शेजारी असलेल्यांना प्रोत्साहन द्या सकारात्मक रहा व निरोगी रहा हीच अपेक्षा करतो.

Comments

  1. आरोग्याची अतिशय मौल्यवान माहिती दिली आहे आपण.मनापासून धन्यवाद.. खुप खुप शुभेच्छा..

    ReplyDelete

Post a Comment