Posts

Showing posts from 2025

अकलेचा कांदा (उपहासात्मक कविता )

 "अकलेचा कांदा " आहे अकलेचा कांदा! परी झाला जगण्याचा वांदा!! शोधतो आहे, कधी भाव येत आहे. का?... व्यापाऱ्याच्या गोदामीच माझा मुक्काम आहे!! एका सडक्या कांद्या पाई, मी आज बदनाम आहे. परी सांगा पाहू...तुम्ही, माझ्या शिवाय का? तुमचा जगण्याचा निभाव आहे. माझ्या शिवाय का?  तुम्ही भाजी करण्यात तरबेज आहे. शिवाय माझ्या... का? जीवनाला तुमच्या आस्वाद आहे. ... तरीही व्यथा, माझ्या किती- बे - भान, मी ही जगतो आहे. आस्वाद देतो जगाला, निस्वाद जगतो आहे. आहे अकलेचा कांदा! परी झाला जगण्याचा वांदा!! ज्ञानेश्वर खरात